विक्रेत्यांकडून बोगस बियाणांची होळी

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना ऑनलाईन,जळगाव

जिल्ह्यात कापूस महत्वाच्या पिकांपैकी एक आहे. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात कापूस पिकाचा पेरा होत आहे. परंतु बोगस बियाणांना शेतकरी बळी पडून त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जिल्हय़ातील विक्रेत्यांनी या बोगस बियाणांची होळी केली.

परिसरात काही वर्षांपासून विविध नावांखाली असे बोगस बियाणे गावोगावो विकले जात आहेत. यात प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात राज्यांमधून बोगस बियाणांचा पुरवठा केला जातो. बियाणे विकत घेताना सरकारमान्य बोलगार्ड २ चे चिन्ह, पक्के बिल, पाकीट, सीलबंद असल्याची खात्री व अंतिम तारीख तपासावी तसेच बियाणे खरेदी करताना अधिकृत बियाणे परववानाधारकाकडूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी कृषी किकास अधिकारी मधुकर चौधरी, जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अमित पाटील, जिल्हा सीड्स , पेस्टीसाईड, फर्टिलायझर डीलर, असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष किनोद तराळ, सुभाष अग्रवाल, राजीव जाजू, संतोष पाटील, बंडू भोळे, रूपेश परदेशी, योगेश लेधिया, सचिन पाटील, अंबादास कराळे, नरेंद्र दाते, दत्तात्रय काकोटे, सुनील पाटील, रूपेश परदेशी, संजय काणी, हरीश गोयंका, प्रशांत बाणाईत व कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.