घ्या अस्सल बोहरी मेजवानीचा आस्वाद, कोहीनूर कॉन्टिनेन्टलमध्ये रंगलाय बोहरी फूड फेस्टिव्हल

1

सामना ऑनलाईन । मुंबई

रंग, गंध, चव आणि अनेक संस्कृतींचा सुरेख मेळ म्हणजे बोहरी मेजवानी. आपल्या कुटुंबासमवेत एकत्र बसून एकाच मोठ्या थाळीत भोजन करण्याची लज्जत म्हणजे बोहरी मेजवानी. ही लज्जत तुम्ही मुंबईतील कोहिनूर कॉन्टिनेन्टलमधील सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये चाखू शकता. सध्या या रेस्टॉरंटमध्ये बोहरी फूड फेस्टिव्हल सुरू असून जगप्रसिद्ध बोहरी फूड एक्सपर्ट शेफ अब्दुल रौफ आणि शेफ जमाल अहमद यांनी खवय्यांसाठी ही खास मेजवाणी तयार केली आहे.

या फेस्टमध्ये सोदानू (गोड भात), कलामरो, अननसाचा हलवा, थुली, बीर, सरकी, गोल पानी, डब्बा गोश्त, स्मोक्ड मटन खिमा समोसा, स्मोक्ड दाल समोसा, चना बटेटा, गुवार बटेटा, मटन शाही कबाब, खिरी, भेजा नि कटलेट, क्रीम टिक्का, ग्रीन डुंगर चिकन, डीसीपी (दाल चावल पालीदु ), बैंगन भरता, मटन खिमा इत्यादी पदार्थ चाखायची संधी मिळेल.

मोठ्या थाळीमध्ये वाढले जाते जेवण

बोहरी मेजवानी ओळखली जाते ती आगळ्यावेगळ्या भोजनपद्धतीमुळे. एका मोठ्या थाळीमध्ये सर्व पदार्थ वाढले जातात आणि कमीतकमी सात माणसं थाळीभोवती बसून भोजन करतात. भोजनाची सुरुवात आणि शेवट होते ती चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून. यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर पळतात असा समज आहे. त्यानंतर गोडाने जेवणाची सुरुवात होते, तसेच सुरुवातीला विविध पेयही घेतात. मेन कोर्सनंतर पुन्हा चिमूटभर मिठाने भोजनाला पूर्णविराम दिला जातो. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही पारंपारिक बोहरी पद्धतीनेही पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

संपर्क- 8879791081