‘या’ अभिनेत्रीच्या पोल डान्सचा इंटरनेटवर धमाका, लाखोंचे हिट्स

90

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंटरनेटवर एका अभिनेत्रीच्या पोल डान्सने धमाका उडवून दिला आहे. एका दिवसात या पोल डान्सला लाखोंचे हिट्स मिळाले आहेत. व्हिडीओमधील अभिनेत्रीचे नाव आहे आयशा गोरडिया. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोल डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओ ती पोल डान्सचे खतरनाक स्टेप्स करताना दिसत आहे. तिच्या या पोल डान्सचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

अभिनेत्री आयशा गोरडिया ही एक पोल डान्सर आहे. तिने याचे लाईव्ह शो देखील केले आहेत. तसेच याआधी तिने पोल डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओंनाही मिलियन्समध्ये हिट्स मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये आयशाचा बोल्ड अंदाजही दिसत आहे.


View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

आयशाने टीव्ही सिरियल ‘अचानक 37 साल बाद’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘अॅक्टिंग-अॅक्टिंग’, ‘बिग बॉस’, ‘बाल वीर’, ‘नच बलिए’ आणि ‘नागिन’मध्ये दिसली. सध्या ही ‘डायन’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.


View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

आपली प्रतिक्रिया द्या