Lok sahba 2019 मोदींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करणाऱ्या काँग्रेसला अभिनेत्याने झापलं

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या असून देशातील सर्वच पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत. याच दरम्यान एकमेकांवर चिखलफेकही जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. या ट्वीटला विरोध करताना बॉलिवूड अभिनेता आर. माधवन याने संताप व्यक्त केला आहे.

मसूद अजहरला पाठिशी घालताना चीनने पुन्हा आपल्या आपल्या मताचा वापर करत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून वाचवले. यानंतर काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती यांचा एक व्हिडीओ शेअऱ केला आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवली. काँग्रेसच्या या ट्वीटला आर. माधवन याने विरोध केला आहे.

काँग्रेसच्या या ट्वीटला रिट्विट करत आर. माधवन म्हणाला की, ‘हे अतिशय खराब आहे. राजकीय विरोध ठिक आहे, परंतु मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि असे मुर्खासारखे व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही (काँग्रेस) चीनसमोर आपल्या देशाची प्रतिष्ठ धुळीस मिळवत आहात. या ट्विटर हँडलवरून अशा प्रकारच्या ट्वीटची मला आशा नव्हती.’