सुष्मिता सेनकडून मुकूट मिळवणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

हिंदुस्थानी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 1995 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब प्रदान केलेल्या चेल्सी स्मिथचे शनिवारी वयाच्या 45व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं.हसतमुख चेल्सीच्या निधनावर सुश्मिताने शोक व्यक्त केला आहे.

अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चेल्सीने 1995मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट आपल्या नावावर केला होता. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकताना त्यावेळी अभिनेत्री सुष्मिता सेनने चेल्सीला मुकूट घातला होता. ‘तिचं हास्य आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व मला अतिशय आवडायचं. माझी प्रिय मैत्रीण आणि 1995ची मिस युनिव्हर्स चेल्सी स्मिथ हिच्या आत्म्याला शांती लाभो,’ असं ट्विट सुष्मिताने केलं. सुष्मिताने ही स्पर्धा 1994 मध्ये जिंकली होती. या पोस्टसह सुष्मिताने चेल्सी स्मिथसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिता सेन चेल्सीला मुकूट घालताना दिसत आहे.