अभिनेत्रींचा चेहऱ्यांमागील चेहरा पाहिलात का?

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील टॉपच्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतली. त्या सर्जरीनंतर काही अभिनेत्रींचे सौंदर्य खरंच खुलले तर काहींना मात्र त्याचा वाईट अनुभव आला आहे.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्राने २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर नाकावर शस्त्रक्रिया केली होती. याशिवाय तिने गोरे रुप मिळवण्यासाठी स्कीन ट्रिटमेंटसुद्धा करुन घेतली आहे.

surgery-2

अनुष्का शर्मा
‘रब ने बना दी जोडी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यानंतर तिच्या ओठांच्या बदललेल्या आकारावरुन सोशल मीडियावर तिला ट्रोलही व्हावे लागले होते.

surgery-5

दीपिका पदुकोण
शस्त्रक्रिया करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचेही नाव आहे. सुंदर दिसण्यासाठी दीपिकाने ब्रेस्ट कॉस्मेटिक सर्जरी केली आहे.

surgery-8

कतरीना कैफ
बॉलिवूडची अभिनेत्री कतरीना कैफने आपल्या ओठ, नाक, गालांवर सर्जरी केली आहे.

surgery-6

काजोल
काही दिवसांपूर्वी काजोल आपल्या गोऱ्या रुपामुळे चर्चेत आली होती. एका कार्यक्रमामध्ये काजोलचे बदललेले रुप पाहून तिने स्किन लायटनिंग ट्रिटमेंट घेतल्याचे उघड झाले होते.

surgery-1

करीना कपूर
करीनाने चेहरा सुंदर व आकर्षक बनवण्यासाठी जबडा व गालांवर शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे आधीपेक्षा जास्त खराब दिसायला लागल्याची चर्चा सुरू आहे.

surgery-3

शिल्पा शेट्टी
या यादीत शिल्पा शेट्टीच्या नावाचाही समावेश आहे. यशस्वी होण्यासाठी शिल्पाने प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला असल्याचे म्हटले जाते. तिने एकदा नव्हे दोनदा नाकावर शस्त्रक्रिया केली आहे.

surgery-4

श्रीदेवी
हवाहवाई गर्ल श्रीदेवी हिने नाकावर शस्त्रक्रिया केली असून आर्टिफिशियल सौंदर्यासाठी तिने बूटॉक्सचेही इंजेक्शन घेतले आहे.

surgery-7