…सिनेसृष्टी ते राजकारण!

सामना ऑनलाईन । मुंबई

सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी नुकतीच राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. सिनेसृष्टीतून राजकारणात जाणारे रजनीकांत हे पहिले राजकारणी नसून याआधीही अनेक बॉलिवूड कलाकारंनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळविला आहे. जाणून घेऊया कोण आहेत हे बॉलिवूड सुपरस्टार

हेमा मालिनी

hema-malini

२००३ ते २००९ या वर्षांत हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपदी एपीजे अब्दुल कलाम यांनी राज्यसभेत खासदार म्हणून हेमा मालिनी यांची नियुक्ती केली होती. हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. २०१४ च्या निवडणुकीत मथुरेच्या जयंत चौधरी यांचा पराभव करून हेमा मालिनी लोकसभेसाठी निवडून आल्या.

जया बच्चन

jaya-bacchan

हिंदुस्थानी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहेत. जया बच्चन राजकीय क्षेत्रातही नेहमीच सक्रीय असतात. हिंदुस्थानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीच्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार या संसदीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

किरण खेर

kiran-kher-1

किरण खेर यांनी महिला बालहत्याविरुद्ध ‘लाडली’ या संस्थेद्वारे आणि ‘रोको कॅन्सर’ कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या या मोहिमेतून राजकारणात प्रवेश केला. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. मात्र ‘आम आदमी पार्टी’ स्थापनेच्या आराखड्यात अण्णा हजारे हे त्या नेतृत्वाचा एक भाग झाले, तेव्हा त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत सहभागी होण्यास नकार दिला. २०११ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपासाठीही प्रचार केला होता. चंदीगड येथे झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्या बहुसंख्य मतांनी निवडून आल्या आणि भाजपने त्यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले.

जया प्रदा

jaya-prada

बॉलीवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी बॉलिवूडला बाय-बाय करत राजकारणात प्रवेश केला. १९९४ मध्ये त्यांनी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) तून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर त्या समाजवादी पक्षात सामिल झाल्या. २००४ च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील रामपूर येथील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. २००९ साली त्यांची पुन्हा निवड झाली.

राज बब्बर

raj-babbar-1

१९८९ मध्ये जनता दलामध्ये प्रवेश करून अभिनेता राज बब्बर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले आणि १९९४ ते १९९९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. २००४ च्या १४ व्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि २००६ मध्ये पक्षातून निलंबित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शत्रुन्घ सिन्हा

shatrugna-sinha-1

बॉलीवूडचा आवडता खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले शत्रुन्घ सिन्हा राजकारणातील सर्वात मोठे नायक बनले. १९९१ मध्ये राजेश खन्ना यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बिहारमधील पटना साहिब मतदारसंघातील शेखर सुमन यांचा पराभव करत त्यांनी २००९ सालची निवडणूक जिंकली अणि त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

अमिताभ बच्चन

amitab

१९८४ मध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी राजीव गांधी यांचा प्रचार करण्यासाठी सिनेसृष्टीला काही काळासाठी ब्रेक देत राजकारणात प्रवेश केला. अलाहाबाद येथील ८व्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात लढत बहुमताने विजयी झाले होते. मात्र, त्यांनी लगेचच तीन वर्षांनंतर राजीनामा दिला.

गोविंदा

govinda

गोविंदा १९९० च्या दशकातील बॉलीवूडचा प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखला जातो. १९९२ मध्ये त्याने कॉंग्रेसचा सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. २००४ मध्ये १४ व्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून संसदेचे सातवे सदस्य म्हणून निवडून आला आणि भारतीय जनता पक्षाचे राम नाईक यांना बहुमताने पराभूत केले. मुंबईत आलेल्या २००५ च्या पुरानंतर त्याच्यावर लोकांकडून टीका करण्यात आली, त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

शबाना आजमी

shabana-azmi

शबाना आजमी यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती.

परेश रावल

paresh-rawal-1

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून परेश रावल यांनी अहमदाबाद पूर्वमधून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.