Pulwama Attack बॉलीवूड कलाकारांमध्ये देखील संतापाचा लाट

सामना ऑनलाईन । मुंबई

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संपुर्ण हिंदुस्थानात संताप व्यक्त केला जातोय. बॉलीवूड कलाकारांनी देखील या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्रोश व्यक्त केला आहे. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, सलमान खान, प्रियंका चोपडा, अनुपम खेर, ऋषी कपूर, जावेद अख्तर, विकी कौषल, आमिर खान, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, स्वरा भास्कर या आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांनी ट्विटरचा आधार घेत आपल्या संताप व्यक्त केला आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहिली

उरी चित्रपटातील अभिनेता विकी कौशल याने “पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मला धक्का बसला असून खूप दु:ख झाले आहे. त्या शूर CRPF जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझे सहवेदना व्यक्त करीत आहे. जखमी जवानांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी” असे ट्विट केले आहे.

ऋषी कपूर यांनी “हा हल्ला अतिशय लाजिरवाणा, धक्कादायक आणि भ्याडपणाचा  आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तर अनुपम खेर यांनी CRPF जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यामुळे मला दु:ख झाले असून प्रचंड राग आला आहे असं म्हटलंय. ज्यांनी आपला पती, भाऊ, बहिण, मुलगा, वडील गमावला आहे अशा सर्वांच्या विषयी माझ्या मनात सहानुभूती आणि आदर आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.