नथुराम गोडसे दहशतवादी! विशाल भारद्वाज यांचे वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी फटकारले

6

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी नथुराम गोडसे यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेत त्याला देशद्रोही म्हटले आहे.

विशाल भारद्वाज यांनी एक ट्वीट करत गोडसेंना स्वतंत्र हिंदुस्थानाचे पहिले दहशतवादी म्हटले आहे. ‘माझ्या एका मित्राने मला विचारले की, स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला दहशतवादी कोण आहे. त्यावर मी विचार केला व तेव्हा मला लक्षात आले की ते गो़डसे आहेत’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यांच्या त्या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.

हैदर चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी एका दहशतवाद्याला हिरो बनवले व लष्कराला त्यांनी दोषी ठरवले आहे. अशी व्यक्ती त्याचे फालतू ज्ञान पाजळत आहे, अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने त्याला देशविरोधी कारवाया करणारा देशद्रोही म्हटले आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या