समलैंगिक संबंधांना परवानगी; बॉलिवूडकरांना आनंद, सोनम कपूरचे डोळे पाणावले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संमतीने स्वीकारलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरणार नाहीत, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या निर्णयाचे बॉलिवूडमधील दिग्गजांनी स्वागत केले असून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा हिने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, या निर्णयाने माझ्या डोळ्यात आनंदअश्रू आल्याचे म्हटले आहे.

377च्या निकालानं ऑक्सिजन मिळाला! करण जोहरची पहिली प्रतिक्रिया
समलैंगिकांना ‘या’ देशांमध्ये मिळते मृत्युदंडाची शिक्षा

सोनमने ट्वीट करत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. ‘जेथे मला राहायला आवडते तोच हा देश आहे. कोणीही एकमेकांचा तिरस्कार करत नाही. अशाच देशावर माझे प्रेम आहे’, असे ट्वीट तिने केले. त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने या निर्णयामुळे माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे ती म्हणाली. आता कोणतेही लेबल नसेल, आता आपण एका आदर्श जगात राहू शकू आणि हा तोच देश आहे जिथे आम्हाला रहायचे आहे.

सोनम कपूरसह बॉलिवूडमधील अन्य काही दिग्गजांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. करण जोहर, अभिनेत्री श्रुति सेठ, अभिनेत्री ऋचा, अभिनेता आयुष्मान खुराना, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, अभिनेत्री कोंकना सेन हिने ट्वीट करत या निर्णयावर आनंद व्यक्त केला.