हॉट सनी लिओनी बनणार फिटनेस गुरु!

सामना ऑनलाईन । मुंबई

आयटम गर्ल, अभिनेत्री, होस्टनंतर आता सनी लिओनी फिटनेस गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. फीट स्टॉप या टीव्ही शोमधून सनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या माध्यमातून सनी प्रेक्षकांना फिटनेसच्या टिप्स देणार आहे. एमटीव्ही बीट्सवर या वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे. व्यायाम, आसनांचे प्रकार तसेच आरोग्यासंदर्भातील टिप्स सनी लिओनी या शोच्या माध्यमातून देणार आहे.

‘शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला फिट राहणं महत्त्वाचं आहे. कमी वेळेत होणाऱ्या व्यायामांसाठी प्रत्येकानेच आपल्या दैनंदिन आयुष्यातून थोडा वेळ काढला पाहिजे. एमटीव्ही बीट्ससोबत ‘फिट स्टॉप’ लॉन्च केला असून, यातून संगीत ऐकत व्यायाम कसा करावा, हे दाखवून देईन’, असं सनी लिओनीने या नव्या कार्यक्रमासंदर्भात बोलताना सांगितलं.