जायकवाडी धरणाच्या भिंतीजवळ ‘पत्रा बॉम्ब’?, पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकला बोलावले

सामना प्रतिनिधी । पैठण

मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे आज सकाळी आढळून आले. या घटनेची माहिती कळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर संभाजीनगर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला आणि श्वान पथकाला पाचारण केले. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतर जायकवाडी धरणाजवळ ‘पत्रा बॉम्ब’ नाही, तर पोलिसांच्या सरावाचा भाग होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाथसागरच्या सुरक्षा भिंतीला थेट खेटून ठेवलेल्या पत्र्याच्या डब्यात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा संशय पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी आधी व्यक्त केला होता. त्यानंतर श्वानपथक व बॉम्ब शोधक पथक आल्यावर याबाबत खुलासा होणार असे सांगण्यात आले होते.