श्रीदेवीचे आज वर्षश्राद्ध, बोनी कपूरने केली पूजा

7

सामना ऑनलाईन । चेन्नई

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले. आज श्रीदेवी यांचे वर्षश्राद्ध असून त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचं श्राद्ध घातलं. या श्राद्धासाठी बोनी कपूर यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनिल कपूर, संजय कपूर, श्रीदेवीच्या मुली जान्हवी व खुशी चेन्नईला गेले आहेत.

गेल्या वर्षी दुबई येथे बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड दुबईत गेले होते. त्यामुळे या सोहळ्याचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याचवेळी अचानक श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त आले व सर्वांनाच धक्का बसला. श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता.