श्रीदेवीच्या पुण्यतिथीला तिच्या साड्यांचा होणार लिलाव

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवी हिच्या अकस्मात निधनामुळे बॉलिवूड तसेच तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला होता. येत्या 24 फेब्रुवारीला श्रीदेवीला जाऊन एक वर्ष होईल. त्या दिवशी श्रीदेवीचे पती बोनी कपूर हे तिच्या काही साड्यांचा ऑनलाईन लिलाव करणार असल्याचे समजते.

श्रीदेवीकडे एकापेक्षा एक सुंदर अशा डिझायनर साड्या होत्या. त्यातील तिच्या आवडत्या कोटा साड्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार असून त्यातून मिळालेला पैसा गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाना देण्यात येणार आहे.

श्रीदेवी यांचा गेल्या वर्षी दुबई येथे हॉटेलच्या बाथ टबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. श्रीदेवी यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी त्या तिथे गेल्या होत्या . त्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड दुबईला गेले होते. त्यामुळे त्यामुळे या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होते. व त्याच वेळी अचानक श्रीदेवीच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांना धक्का बसला होता.