विमान प्रवासात मिळवा ५ हजार रुपयांची सूट !

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

विमानाचे तिकीट सरकारी भीम अॅपवर बुक करणार असाल तर तुम्हाला देशांतर्गत विमानप्रवासात ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. इंडिगो आणि गो एअर या विमान कंपन्यांनी आपल्या २० लाख सेटस्साठी सेल ऑफर सुरु केली आहे. याशिवाय स्पाईस जेटचे तिकीट या सरकारी अॅपवर काढल्यास तिथेही प्रवेशास ५ हजारांची सवलत मिळणार आहे. स्पाइस जेटच्या वन वे ट्रिपवर ५०० रुपये आणि राउंड ट्रीपवर १००० रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.

कसा घ्याल या ऑफरचा लाभ

सर्वप्रथम https://www.thomascook.in या संकेतस्थळावर जा

त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आणि इतर आवश्यक सर्व माहिती टाका.

आता तुम्हाला BHIMUPI प्रोमो कोड पेमेंट करताना टाकावा लागेल.

त्यानंतर ऑर्डर चेक आउट करा आणि भीम युपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करा

लक्षात ठेवा ३१ डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, १ ते १० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी या ऑफरचा लाभ प्रवाशांना घेता येणार नाही.

summary-Book Domestic Flights And Get Discount Upto 5000 Rs