सोशल मीडियाद्वारे करा गॅसचे बुकिंग

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रत्येक गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सोशल मीडियाद्वारे गॅस सिलेंडरही बुक करू शकणार आहात. इंडियन ऑयल कार्पोरेशन (IOCL) च्या फेसबुक पेजवर गॅस सिलेंडरची बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच तुम्ही सिलेंडर बुकिंगची हिस्ट्रीदेखील पाहू शकणार आहात. गॅस सिलेंडरच्या सर्व सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही सोय सुरू करण्यात आली असून देशभरातील ११.५० करोड लोक याचा उपभोग घेऊ शकणार आहेत.

कसे कराल बुकिंग ?

फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी सर्वप्रथम लॉगिंग करा. त्यानंतर इंडियन ऑयल कार्पोरेशन लिमिटेडचे पेज ओपन करा. या पेजच्या उजव्या कोपऱ्यात बुक नाऊ या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन झाल्यानंतर कन्टिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा एलपीजी आय डी क्रमांक टाईप करून बुक नाऊचा वर क्लिक करा. बुकिंग झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कन्फर्मेशनचा मेसेज प्राप्त होईल.