२०१७: कमाईत अव्वल ठरलेले चित्रपट

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या सलमान खानचा ‘टाइगर जिंदा है’ चित्रपट बॉक्स ऑफिवर चर्चेत असून ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. ‘बाहुबली’च्या हिंदी चित्रपटाने जवळजवळ ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. ‘टाइगर जिंदा है’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘टाइगर जिंदा है’ने ‘गोलमाल अगेन’च्या संपूर्ण कमाईला सात दिवसांतच मागे टाकले असून २०१७मधील सर्वात जास्त कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीत अजय देवगनचा हा चित्रपट आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशातच बॉलिवूडच्या सर्व चित्रपटांच्या कमाईचे निकाल आले आहेत. या वर्षातील टॉप १० चित्रपटांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये आतापर्यंत बाहुबलीने आपले स्थान कायम ठेवले आहे. तर ‘टाइगर जिंदा है’ ची वाटचाल सुरू आहे.

२०१७मधील टॉप ५ चित्रपट –

बाहुबली ५०० कोटी रुपये
टाइगर जिंदा है २०६ कोटी रुपये (फक्त सात दिवसांत)
गोलमाल अगेन २०५.७२ कोटी रुपये
जुडवा-२ १३८ कोटी रुपये
रईस १३६ कोटी रुपये

दरम्यान, ‘टॉयलेटः एक प्रेमकथा’, ‘काबिल’, ‘ट्युबलाइट’, ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘बद्रीनाथ की दुलहनिया’ या चित्रपटांनी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या वर्षात अनेक मोठ्या सेलिब्रिटींना बॉक्स ऑफिसवर पराभव पत्करावा लागला आहे.