प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक

सामना प्रतिनिधी । मुंबई

ओशिवऱ्यातील प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली. विजय असे या प्रियकराचे नाव असून लग्नास नकार दिला म्हणून तिने हे पाऊल उचलले. जोगेश्वरी पश्चिमेकडील विकासनगरमध्ये राहणाऱ्या ज्योती खपले (१८) हिने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत विजयने लग्नास नकार दिला म्हणून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.