ऑनलाईन गेम हरल्याच्या दु:खात मुलाने स्वत:चे मुंडके उडवले

50

सामना ऑनलाईन, मोगोचिन्हो

ऑनलाईन गेमचं व्यसन हा रशियामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त वादाचा मुद्दा बनला आहे. एका मुलाच्या मृत्यूने या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. अवघ्या १५ वर्षांचा मुलगा या व्यसनाचा बळी ठरला आहे. पॉवेल मॅटवीव असं या मुलाचं नाव आहे.

पॉवेलला कॉम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळण्याचं भयंकर व्यसन लागलं होतं. खेळात हारजीत ठरलेली असतं. मात्र त्या लहान मुलाला जिंकणं हे अभिमानाचं लक्षण वाटत होतं तर पराभूत होणं लाजिरवाणं वाटत होतं. काही दिवसांपूर्वी पॉवेल खेळत असताना गेममध्ये हरला. गेममध्ये हरल्याने त्याला इतकं दु:ख झालं की तो घरामागच्या बगिच्यात गेला आणि झाडं कापण्याची इलेक्ट्रीक करवत घेऊन त्याने स्वत:चं मुंडकं उडवलं. ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे, कारण हा कॉम्प्युटर तिनेच त्याला आणून दिला होता.

पॉवेल कोणता गेम खेळत होता हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. मोमो चॅलेंज किंवा ब्ल्यू व्हेल चॅलेंजसारखा हा प्रकार आहे का हे पोलीस तपासण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या