खेळताना काच लागून मुलाचा मृत्यू

22
सामना ऑनलाईन । नाशिक
घरातल्या घरात खेळतेवेळी चेंडू दरवाजाजवळ गेला आणि तिथे असलेली काच पोटात घुसल्याने चार वर्षांच्या साईश पाबळे याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नाशिकच्या पंचवटी भागात आज मंगळवारी घडली.
मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात सोपान संकुलमध्ये केशव पाबळे आणि त्यांचे कुटुंब राहते. संध्याकाळी पाबळेंचा मुलगा साईश घरातच चेंडू घेऊन खेळत होता. चेंडू दरवाजाजवळ गेला. चेंडू घेण्यासाठी धावत गेलेला साईश दरवाजावर आपटला आणि दरवाजात असलेली काच फुटली. फुटलेली काच पोटात घुसल्याने साईशला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या साईशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साईशचा मृत्यू झाला.
आपली प्रतिक्रिया द्या