फोटोच्या नादात तरुण नदीत बुडाला

सामना प्रतिनिधी । नागपूर

सेल्फी आणि फोटोच्या वेडापाई नागपूरमध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. मोहनीस अकील पटले (२३) असे नदीमध्ये बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन भंडारा येथील रहिवासी आहे. पोलीस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून तरुणाचा शोध सुरू आहे. मात्र नदीचा प्रवाह वेगवान असल्याने शोधमोहीमेत अद्याप यश मिळालेले नाही.

रायसोनी कॉलेजमधील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे पाच तरुण आपल्या मित्रांसोबत वाकीकडे असलेल्या द्वारका वॉटरपार्ककडे गेले होते. हा वॉटरपार्क सुरू होण्यास वेळ असल्याने ते वाकी येथील कन्हान नदीवर आनंद घेण्यासाठी गेले. फोटोशुट करण्यासाठी ही मुले वाकी येथील नदी पात्रात उतरले असता, त्यापैकी मोहनशील अकील हा पाण्याची खोली असलेल्या पात्रात गेला आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडाला. त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसाना माहिती दिली असून शोध सुरू आहे.