पतंग उडवताना 12व्या मजल्यावरून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

1

सामना प्रतिनिधी । पुणे

पतंग उडवताना तोल जाऊन 12व्या मजल्यावरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी कात्रज येथील गोकुळनगरमध्ये घडली. ओम धनंजय अतकरे (वय 12, रा. गोकुळनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी नोंद केली आहे.

नगर : मकरसंक्रांतीला गालबोट, पतंग उडवताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

ओमचे वडील धनंजय अतरके यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वीच अतकरे कुटूंबीय गोकुळनगर येथील होमी पार्क इमारतीमध्ये रहायला आले आहेत. या इमारतीचे काम अद्यापही सुरू आहे. ओमच्या शाळेत आज कार्यक्रम असल्याने तो आज शाळेत गेला नव्हता. सकाळी तो पतंग उडविण्यासाठी 12व्या मजल्यावर टेरेसवर गेला होता. बराच वेळ झाला तो घरी न आल्याने ओमचा भाऊ आदित्य हा त्याला बोलविण्यासाठी टेरेसवर गेला. ओम कोठेही दिसत नसल्याने त्याने आजूबाजूला शोध घेतला, इमारतीच्या खाली डोकावले असता तो खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आदित्यने त्वरीत याची माहिती आईला दिली. ओमला रूग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषीत करण्यात आले. अंडरकंस्ट्रक्शन इमारतीमध्ये सुरक्षेसाठी काहीच उपाय योजना न केल्याने ही दुर्घटना घडली आहे.