ब्राझीलमध्ये बंदूकधार्‍यांचा बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; 11 ठार

7

सामना प्रतिनिधीरिओ डि जानीरो

उत्तर ब्राझीलमध्ये बंदूकधार्‍यांनी रविवारी एका बारमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान 11 लोक ठार झाल्याचे प्रशासनाने आज सांगितले. बेलेम शहरातील बारमध्ये ही घटना घडल्याचे पॅरा राज्यातील सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितले. दरम्यान, या गोळीबाराच्या हेतूबद्दल अद्यापि कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. ‘न्यूज वेबसाइट जी वन’ने दिलेल्या वृत्तानुसार गोळीबारानंतर हल्लेखोरांनी पलायन केले, मात्र एक जखमी हल्लेखोर पोलीस कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. या भीषण घटनेत सहा महिला आणि पाच पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या