न्याहारी महत्त्वाची

8


सामना ऑनलाईन । मुंबई 

– नाश्ता न केल्याने मेटाबॉलिजम हळू होते. त्यामुळे शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते. यामुळे वजन वेगाने वाढते.
– रात्रभर उपाशीपोटी राहिल्याने शरीरात ऑसिड्सचे प्रमाण वाढते. ऑसिड्समुळे अन्नाचे पचन होते, मात्र ज्यावेळी पोटात काही नसते तेव्हा ऑसिड ऑसिडिटी वाढवते.
– ऑसिडीटीची समस्या नाश्ता नाही केला तर वाढत जाते. असे दीर्घकाळ झाले तर अल्सर होऊ शकतो.
– नाश्ता न करणाऱ्या लोकांमध्ये ह्रदयविकाराचा धोका जास्त असतो. यामुळे लठ्ठपणा वाढल्यामुळे ह्रदयावर परिणाम होतो.
– मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
– शरीरातील ग्लुकोजची मात्रा कमी होते. यामुळे दिवसभर शरीरात उत्साहाची कमतरता जाणवते आणि थकवा येऊ शकतो.
– चिडचिड वाढवणाऱया हार्मोन्सचं प्रमाण शरीरात वाढतं. त्यामुळे मूड बदलतो.
– मेंदूला परिपूर्ण पोषण आणि एनर्जी नाश्ता केल्यामुळे मिळत असते, मात्र नाश्ता करण्यास टाळाटाळ केल्यास मेंदुच्या कार्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे एखादे काम मन लावून करण्यास अडथळे येतात.
– नाश्ता केलेला नसताना बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची मात्रा संतुलीत राखण्यासाठी हार्मोन्स वापरले जातात.यामुळे मायग्रेनचा अॅटॅक येऊ शकतो.
– बऱ्याच जणांना दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत खूप भूक लागते. अशावेळी अपौष्टिक किंवा फास्ट फूड खाल्ले जाते. यामुळे निराशा, ताण यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.

आपली प्रतिक्रिया द्या