आमदाराची भावी वधू लग्नापूर्वीच फरार, प्रियकरासोबत पळून गेल्याचं उघड

27

सामना ऑनलाईन, इरोडे

लग्नाला अवघे ८ दिवस उरलेले असताना एका आमदाराची भावी वधू गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं उघड झालं असून या तरुणीच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रारही दिली आहे. या घटनेने आमदाराची मात्र जाम पंचाईत झाली असून त्याला भयंकर मनस्ताप सहन करावा लागला आहे.

तमिळनाडूमधील भवानीसागर मतदारसंघाचे आमदार एस.ईस्वरन (वय-४३ वर्षे) यांचं लग्न २३ वर्षांच्या आर.संध्या हिच्याशी ठरलं होतं. या लग्नासाठी बन्नारी अम्मन मंदिरात जोरात तयारी सुरू होती. या लग्नासाठी तिथले मुख्यमंत्री पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वमही उपस्थित राहणार होते. शनिवारी आमदाराच्या भावी वधूने ती तिच्या बहिणीच्या घरी घरी जात असल्याचं सांगितलं. मात्र ती बहिणीच्या घरी पोहोचलीच नाही. तरुणीच्या घरच्यांनी शोधाशोध करायला सुरूवात केली मात्र ती काही सापडली नाही अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

तरुणीची आई थंगमणी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली, या तक्रारीत त्यांनी म्हटलंय की त्यांची मुलगी विघ्नेश नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती, आणि त्यांना संशय आहे की ती त्याच्यासोबतच पळून गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या