सामना ऑनलाईन । नवी दिल्ली/मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी घसरण सुरूच असताना दोन दिवसात मुंबई शेअर बाजारही कोसळला. मंगळवारी एका महिन्यातील विक्रमी 509 अंकांनी सेन्सेक्स कोसळला. दोन दिवसांत सुमारे 1000 अंकांची पडझड झाली आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया 72.73 ने लुडकला आहे.

मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स कोसळायला सुरुवात झाली. ही पडझड दिवसभरात थांबली नाही. बाजार बंद होताना सेन्सेक्स 509 अंकांनी कोसळून 37413.13 अंकांवर स्थिरावला होता. सोमवारी सेन्सेक्स 474 अंकांनी कोसळला होता.

रुपयाची पडझड थांबेना

मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी घसरला. एका डॉलरसाठी तब्बल 72 रुपये 73 पैसे मोजण्याची वेळ आली. इतिहासातील ही विक्रमी पडझड आहे. ही पडझड सुरूच राहण्याची शक्यता आहे.

किती मोजायचे रुपये? -चलन रुपये

डॉलर – 72.73
पौंड – 94.65
युरो – 84.20
येन – 65.29