शेअर बाजारात उत्साह कायम, ३९ हजार टप्प्यात

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शेअर बाजाराची जबरदस्त घोडदौड बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 38,898.27 वर बुधवारी सुरू झाला. बाजाराती उत्साह असाच कायम राहिल्यास शेअर बाजार 39 हजाराचा टप्पा गाठेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तर निफ्टीही वाढ होऊन निर्देशांक 11,735.40 वर पोहोचला आहे. लवकरच निफ्टी हा 12 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.