खूशखबर! ‘ही’ कंपनी देतेय १७१ रुपयांत २ जीबी डाटा

10

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टेलिकॉम क्षेत्रातील एअरटेल आणि जीओ या बड्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने मोठा निर्णय घेतला. बीएसएनएलने आपला नवीन प्री-पेड पॅक लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार ग्राहकाला फक्त १७१ रुपयांत २ जीबी डाटा मिळणार आहे. हा प्लॅन सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये सुरू करण्यात आला असून लवकरच इतर भागातही सुरू होण्याची शक्यता आहे. २ जीबी डाटासह ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस प्रतिदिन मिळणार आहेत.

यापूर्वी एअरटेलने १९९ रुपयांत १.४ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस प्रतिदिनची ऑफर दिली होती. याला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने नवा प्लॅन जारी केला आहे. तुलनात्मकदृष्ट्या बीएसएनएलच्या प्लॅनसाठी कमी पैसे आणि ०.६ जीबी डाटा जास्त मिळत असल्याने या स्पर्धेत ग्राहकांचा फायदाच होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या