गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ३ जखमी

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या गिरगाव भागात खाडिलकर रोडवर बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला. यामुळे तीन जण जखमी झाले असून त्यांना गिरगावमधील जैन क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही इमारत मेहता डेव्हलपर्सची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

व्ही.पी.रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव लेन, खाडिलकर रोड, गिरगाव या ठिकाणी मेहता सनशाईन हाइट्स या बिल्डिंग चे नुतनीकरणाचे काम सुरू होते. यावेळी २० व्या मजल्यावरुन लोखंडी फ्रेम बाजूच्या ३ मजली इमारत व रस्त्यावर पडली. या दुर्घटनेमध्ये  विनिता शहा (वय ३५ वर्षे),विना शहा (वय-५ वर्ष) , हनीष शहा (२ वर्ष) आणि ऋतू शहा (वय-३ वर्षे)हे जखमी झाले  आहे. जखमींवर चर्नी रोडच्या सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.