प्रकट दिनानिमित्त बुलडाणा अर्बनतर्फे अन्नछत्राचे आयोजन

3

सामना प्रतिनिधी। बुलढाणा

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिंडीतील भाविक भक्तांकरिता बुलडाणा अर्बन परिवारातर्फे अन्न छत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन 25 फेब्रुवारी रोजी असून त्यानिमित्त मराठवाड्यातून अनेक भाविक भक्त दिंड्या घेऊन महाराजांचे दर्शनास येतात. दिंडीतील भाविक भक्तांना त्यांच्या पायी प्रवासादरम्यान मुक्काम व भोजन व्यवस्था करावी लागते. त्याकरिता यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्त शेगाव येथे जाणार्‍या पायी दिंड्यांच्या मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने 19 ते 24 फेब्रुवारी अशा सहा दिवसात जाणार्‍या विविध दिंड्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविक भक्तांची मुक्कामाची व भोजन व्यवस्था वरवंड नाक्या जवळील श्री सावजी फार्मवर करण्यात आली आहे. तरी दिंडी प्रमुखांनी आपल्या दिंडीची मुक्कामाची व भोजनाची आगाऊ सूचना सुधीर भालेराव यांना मोबाईल क्र.9011023135 व अरुण दलाल यांना मोबाईल क्र.90110023655 वर द्यावी म्हणजे त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करता येईल असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थाध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.