चेंबूरमध्ये 470 बेकायदा झोपड्यांवर पालिकेचा बुलडोझर


सामना ऑनलाईन । मुंबई

चेंबूरमधील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजकळील राज्य सरकारच्या जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या तब्बल 470 झोपड्यांवर पालिकेने बुलडोझर फिरवला. गेल्या तीन दिवसांपासून  ही कारवाई सुरू असून उर्वरित 250 झोपड्या हटवण्याचे कामही वेगात सुरू आहे. तब्बल साडेसात एकरांवर हे अतिक्रमण करण्यात आले होते.

चेंबूरमधील या जागेवरील अडीच एकरच्या भूखंडावर 170 झोपड्या बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्या होत्या, तर नागेवाडी भागातील मॉडर्न शाळेजकळ क रंगप्रभा इमारतीसमोर पाच एकराच्या भूखंडाकर 550 झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या कारवाईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजकळील अडीच एकरांकरील 170 झोपड्या हटकिण्यात आल्या, तर दुसऱ्या पाच एकरांकरील 300 झोपड्या आतापर्यंत हटवण्यात आल्याचे परिमंडळ-5 चे उपायुक्त भारत मराठे यांनी सांगितले.

137 पोलिसांचा ताफा, 120 कामगार-अधिकारी

सदर दोन्ही भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील 137 पोलीसांचा ताफा घटनास्थळी तैनात ठेवण्यात आला. या कारवाईकरिता पालिकेला टिळकनगर पोलीस ठाण्याचे विशेष सहकार्य लाभले. याव्यतिरिक्त महापालिकेचे 120 कामगार-कर्मचारी-अधिकारीदेखील या कारकाईत सहभागी झाले.