वसामुळे निसरड्या रस्त्यावर दोन एसटी बसचा अपघात

14

सामना प्रतिनिधी । देवरूख

संगमेश्वर-देवरुख- कोल्हापूर मार्गावर करंबेळे मैल येथे दोन एसटी गाड्यांचा अपघात झाला. समोरासमोर आल्याने बाजू देताना हा अपघात घडला. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

देवरुखकडून देवरुख- नेरदवाडी ही गाडी संगमेश्वरच्या दिशेने जात होती तर मुंबई – देवरुख ही गाडी देवरुखकडे येत होती. करंबेळे मैल येथे या गाड्या आल्या असता अपघात झाला. या अपघातात देवरुख- नेरदवाडी गाडीचा चालक व 5 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी देवरुख पोलिस हजर झाले असून पंचनामा उशिरापर्यंत सुरू होता.शिल्पा मिरगल, राजश्री रेवाळे, स्मिता चव्हाण, सुरज खानविलकर, पराग देवळेकर, मानसी उबारे हे प्रवासी जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या