बस दुर्घटनेत ४४ प्रवाशांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। लीमा

पेरूमधील अरेक्विपा भागात बुधवारी झालेल्या बस दुर्घटनेत ४४ प्रवासी ठार झाले आहेत. तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कैमानाच्या उत्तर पैन-अमेरिका महामार्गावरील डोंगराळ भागातून जाताना ही प्रवासी बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समजलेले नाही.

बसमध्ये एकूण ४५ प्रवासी असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच पेरूमध्ये झालेली ही दुसरी मोठी बस दुर्घटना आहे. याआधी जानेवारी महिन्यात झालेल्या बस दुर्घटनेत ४८ जणांचा मृत्यू झाला होता.

  • Shailendra Mehta

    45 pravasi madhil 44 gele aani mug 24 kase jakhami zale.
    Ishwar mrutatmyana Shanti devo