मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, लक्झरी पलटी

bus-accident-mumbai-ahmedabad

सामना प्रतिनिधी । ठाणे

एका ट्रव्हल कंपनीची लक्झरी बस गुजरातकडून पुणे येथे जात असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवणखिंड नजिक वाडा खडकोना येथे अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कल्पना ट्रॅव्हलची खासगी बस गुजरातकडून पुण्याला निघाली होती. आज पहाटे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवणखिंड नजिक वाडा खडकोना येथे चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. बस मधे 35 प्रवाशी होते. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.