अपघातानंतर खासगी बस पेटवली, पाच जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर

सावनेर-नागपूर मार्गावर शनिवारी रात्री खासगी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या समोरासमोर धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी खासगी बसला आग लावली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती.

माळेगाव बसस्थानकाजवळ शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मध्य प्रदेशच्या मिगलानी या खासगी बसने सात प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षाचालक आणि अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. जखमींपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या पाचवर गेली आहे.

मृतांची नावे –

उमेश विनायक दहिकर (वय – २५)
सुनील कृष्णा चांदूरकार (वय – २५)
अर्चना राजू पालेकर (वय – ३५)
गजानन पांडुरंग चांदूरकर (वय – ४०)
कमला मधुकर पालेकर (वय – ७५)