‘स्त्री’ची जबरदस्त जादू, बसमध्येही झळकली

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा ‘स्त्री’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. चित्रपटात श्रद्धाने साकारलेली भूमिका तिच्या चाहत्यांना फार आवडली असून आता सार्वजनिक वाहनांवर देखील श्रद्धाच्या ‘स्त्री’ जादू पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या बेस्ट बसेसमधील स्त्रियांसाठी राखीव सीट्सवरही श्रद्धा कपूरचे फोटो लावलेले दिसत आहेत. श्रद्धाच्या चाहत्यांनी हे फोटो लावल्याचे बोलले जात आहे.

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या स्त्री या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव हे मुख्य भूमिकेत आहेत. हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

summary : A bus in Mumbai featured pictures of ‘Stree’ Shraddha Kapoor on the seats which are reserved for just women