गोळ्या झाडून घेतलेले उद्योजक अभिजीत सावंत यांचे निधन

20

सामना प्रतिनिधी । नगर

नगरमधील प्रसिद्ध ‘सावंत ट्रान्सपोर्ट’चे संचालक अभिजीत सावंत यांनी काल डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरू असतानाच आज गुरूवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. या प्रकारामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

काल जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा तसेच अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी या बाबतची माहिती घेतली होती. शहरात मार्केटयार्ड परिसरामध्ये अभिजीत यांचे सावंत ट्रान्सपोर्ट नावाचे मोठे कार्यालय आहे. नगर जवळील चांदबीबी महालावर ते सायंकाळी पाचच्या सुमाराला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचर सुरु असताना आज त्यांचे निधन झाले आहे.

दरम्यान नगर शहरामध्ये 31 मार्च 2018 रोजी व्यावसायिक बाळासाहेब पवार यांनीही गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याचा तपास अद्यापही सुरुच आहे. काल सावंत यांनी कर्जपणाला कंटाळून आत्महत्या केली असून त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ही बाब उघड झालेली आहे. या घटनेसंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीसा निरीक्षक किरण शिंदे हे पुढील तपास करीत आहे. नगर शहरात कर्जबाजारी पणाच्या प्रकरणामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार थांबायला यातर नाही मात्र यातुन अद्यापही तब्बल वर्षभरात सहकार व पोलीस खात्याकडुन ठोस कशी कोणतीच कारवाई झालेली नसल्याने या खात्याच्या कामकाजाबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या