फुलपाखरांचे बेट

421

मनीषा सावंत

अंदमान- निकोबार द्वीपसमूह… आपला नितांत सुंदर प्रदेश… सध्या दिवस भटकण्याचे, मौजमजेचे आहेत. या दोन नितळ, सुंदर बेटावरील काही माहीत नसलेल्या रंजक गोष्टी…

थंडीच्या दिवसांमध्ये बरेचजण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला निघतात… बरीच ठिकाणे आपल्याला माहीत असतात. तेथे काय पाहायला जायचे हेही आपण मनोमन ठरवतो. पण काही ठिकाणे अशीही आहेत जी आपल्याला माहीत आहेत, पण तेथील काही गोष्टी अजूनही फारशा कुणाला माहीत नाहीत. खरे सांगायचे तर अंदमान हे बेट फुलपाखरांचे बेट म्हटले पाहिजे. कारण अंदमान-निकोबार ही बेटं. हे बेट फुलपाखरांसाठी ‘हॅप्पी आयर्लंड’ आहे. जवळपासच्या उष्णकटिबंध बेटांकरून हजारो फुलपाखरे येथे येतात. मलय भाषेत रामायणातील हनुमानाच्या पात्राला हंडुमान म्हटले जाते आणि निकोबारचा अर्थ आहे नेकेड… म्हणजे नग्न लोकांचे बेट. आता यात किती तथ्य आहे हा भाग वेगळा, पण अंदमान हा शब्द म्हणजे हनुमानाचे एक रूप आहे, जो संस्कृतशी साधर्म्य दाखवणाऱया मलय भाषेमधून आला आहे.

andaman-ff

अंदमान म्हटलं म्हणजे इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती आणि तेथून सावरकर सुटून आले होते एवढेच आपल्याला माहीत आहे. तेथील सेल्युलर जेल आजही स्वातंत्र्यवीरांच्या खणखणीत स्वराज्यभक्तीची गोष्ट सांगत असतात. हे कारागृह पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जातात. पण आजही या बेटावर कितीतरी अशी ठिकाणे आहेत जिथे आजवर मनुष्य पोहचू शकलेला नाही. येथील 572 बेटांपैकी केवळ 36 अशी बेटे आहेत जिथे माणूस जाऊ शकतो आणि राहू शकतो. निकोबारवर जाण्यासाठी फक्त संशोधन आणि सर्वेक्षण करण्यासाठीच काही लोक जाऊ शकतात.

येथील माहीत नसलेल्या गोष्टी म्हणजे हिंदुस्थानात एकच सक्रीय ज्वालामुखी आहे तो अंदमानात… हे फारसे कुणाला माहीत नाही. हा ज्वालामुखी आइलँड पोर्ट ब्लेअरपासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. हा ज्वालामुखी पाहण्यासाठी म्हणून असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देतात. आणखी एक बाब म्हणजे येथे सर्वात जास्त ‘समुद्र कासवे’ सापडतात. जगातील सर्वात मोठे कासवही येथेच सापडले. ही समुद्री कासवे आकारात खूप मोठी असतात. जगातील सर्वात छोटा कासव ओलिक रिडलेसुद्धा अंदमानात आपले घर बनवतो.

अंदमान बेटावर आजूबाजूला सगळीकडे समुद्र आहे म्हणजे भरपूर मासेमारी करता येईल असा समज असेल तर तो मनातून काढून टाका. कारण या बेटावर व्यवसायासाठी मच्छीमारी करायला पूर्णपणे बंदी आहे. जगातले हे एकमेव ठिकाण असेल जेथे समुद्री प्राण्यांना त्याचे जीवन मोकळेपणाने जगता येते. आपल्या रुपयांच्या नोटीकर जो जंगलाचा भाग दिसतो, तो अंदमान बेटाचाच आहे. म्हटलं जातं की, शंभर वर्षांपूर्वी सूर्याची पहिली किरणे अंदमानच्या बेटांवर पडली होती. म्हणजे त्या दिवशी सूर्य या भागातून उगवला होता. असे सौभाग्य ‘कैचल’ बेटाला ही मिळाले होते. आपल्या देशापेक्षा अंदमान हे बेट इंडोनेशिया आणि म्यानमार देशांच्या जवळ आहे. अंदमान इंडोनेशियापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हेच बेट हिंदुस्थानापासून मात्र तब्बल 800 किलोमीटर लांब आहे.

अंदमानबद्दल आणखी एक गोष्ट फारशी माहीत नाही ती ही की, या बेटावर ‘कोकोनट क्रॅब’ जातीचे खेकडे भरपूर दिसतात. त्यांची लांबी तब्बल 1 मीटरपर्यंत असते. नारळ हा त्यांचा आकडता आहार असतो. आपल्या तोंडाने ते नारळासारख्या मजबूत कवच सहज तोडू शकतात. या बेटावर सर्वात जास्त बोलली जाते ती बंगाली भाषा… त्याशिवाय येथे हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम भाषा बोलणारे लोकही आहेत. अंदमानचा राज्यप्राणी डुगोंग हा एक समुद्री जीव आहे आणि तो आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहतो.

दुसऱया महायुद्धातील कामगिरी

दुसऱया महायुद्धाच्या काळात अंदमान आणि निकोबार बेटांची कामगिरी खूपच महत्त्वाची आहे. ही बेटे म्हणजे हिंदुस्थानचे एकमेव भूमीक्षेत्र होते ज्यावर जपानने कब्जा केला होता. जपानने त्यावेळी हिंदुस्थानच्या उत्तर-पूर्वचा काही भागही काबीज केला होता. अंदमानात आपली कॉलनी बनवणारा पहिला युरोपीय माणूस डॅनिश होता. तो डेन्मार्कचा रहिवासी होता. 1755 साली तो अंदमानला पोहोचला. त्यानंतर इंग्रज प्रथमच 1789 साली अंदमानच्या चंथम बेटावर उतरले. इंग्रजांनी इथे आपली कॉलनी आणि नेकेल मिलेट्री बेस बनवला. डेनिश वसाहत कायदा 1868 साली संपुष्टात आणला गेला, कारण इंग्रजांनी ती जागा विकत घेतली होती. त्यानंतर संपूर्ण बेटावर इंग्रजांचे राज्य झाले होते. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या ‘आझाद हिंद सेनेला’ जपानच्या मदतीने अजून मजबूत केले. हा दुसऱया महायुद्धाचाच काळ होता. बोसांनी अंदमान-निकोबारच्या उत्तर आणि दक्षिणी बेटांना शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नाव दिले.

आपली प्रतिक्रिया द्या