पालघर लोकसभा पोटनिवडणूक बविआ लढवणार

2

सामना ऑनलाईन । पालघर 

पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीने ( बविआ) घेतला आहे. बविआच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे पालघर जिह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 शिवसेनाही सज्ज
पालघर जिह्यात शिवसेनेसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला दणदणीत यश मिळाले आहे. पालघरची लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याची तयारीही शिवसैनिकांनी केली असून शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर ही निवडणूक स्वबळावर लढवून जिंकूच, असा निर्धार पालघर जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.