नंगू-चंगू आंदोलन, ओलातून हकालपट्टी झाल्याने ड्रायव्हर भडकला

9

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

ओला कंपनीने हकालपट्टी केली म्हणून एका कॅब ड्रायव्हरने ओला कार्यालयासमोर नग्न होत आंदोलन केले आहे. हैद्राबादमधील कार्यालयासमोर हा प्रकार घडला आहे. अर्जुन असे त्या ड्रायव्हरचे नाव असून त्याने ओलाने त्याच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे.

अर्जुन हा हैद्राबादमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ओला कंपनीसाठी गाडी चालवत आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्जुन कामाला निघाला मात्र त्याला अचानक राईड मिळणं बंद झालं. त्याने याबाबत ओला कॅबच्या कस्टमर केअरला विचारलं. त्यावेळी कंपनीने काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. मात्र सलग दहा दिवस अर्जुनला एकही राईड न मिळाल्याने त्याने पुन्हा एकदा याबाबत तक्रार केली. त्यावेळी त्याला तू काम बंद कर असे सांगण्यात आले. ते ऐकून अर्जुनला धक्का बसला. त्याने याबाबत कारण विचारले तेव्हा त्याला कारण सांगण्यासही कंपनीने नकार दिला. त्यानंतर अर्जुनने कंपनीच्या कुकाटपल्ली येथील कार्यालयाबाहेर नग्न होत आंदोलन केले. अर्जुनच्या या आंदोलनाला इतर टॅक्सी चालकांनी देखील पाठिंबा दिला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशभरातील ओला उबेर ड्रायव्हर्सनी कंपनीच्या मनमानी कारभारांविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी तब्बल दहा दिवस एकही ओला उबेर गाडी रस्त्यावर उतरली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या