निळवंडे धरणाचा प्रश्न लागणार मार्गी, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंनी घेतला पुढाकार

288

सामना ऑनलाईन । मुंबई

निळवंडे कालव्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नात मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विजय शिवतारे, माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी जिल्हा पोलीस अधिक्षक संधू यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अकोले तालुक्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी आणि सर्वपक्षांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची काम तातडीने सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रकल्प अहवालात असलेल्या अटी आणि शर्थीमध्ये कोणताही बदल न करता ही काम पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी अकोले तालुक्यातील निर्माण झालेल्या कालव्याच्या कामातील समस्या जाणून घेतल्या. अकोले तालुक्यातील कालव्यांची काम ही बंदीस्त न करता ठरलेल्या पध्दतीनेच करण्याबाबत एकमत झाले. तालुक्यातील डाव्या आणि उजव्या उच्चस्तरीय कालव्यांची काम एकाचवेळी सुरू करून वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या