पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्याल ?

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात तर पावसाने मुंबईला अक्षरश: धुवून काढले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ते पाण्याखाली गेले. तर गाड्यांमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहनं रस्त्यातच बंद पडली. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. पण या गोष्टी टाळता येणं सहज शक्य आहे. त्यासाठी फक्त गाड्यांची थोडी काळजी घ्यायला हवी.

car-in-water

काय कराल ?

> पावसाळ्यात चेसिसमध्ये पाणी भरते. यामुळे गाडयांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी चेसिसमध्ये पाणी भरल्याचे दिसताच गाडी सर्विस सेंटरमध्ये न्यावी. चेसिसमधले पाणी काढून घ्यावे.

> पावसाळ्यात बरेच जण गाडी खराब होऊ नये म्हणून त्यावर कव्हर घालतात. पण त्यामुळे गाडीचे नुकसान होते. गाडीचा पत्रा लवकर गंजतो. पावसात गाडी भिजल्यास नंतर ती आतून बाहेरुन स्वच्छ करावी. कारण गाडी भिजल्यावर पाणी गाडीच्या कुठल्या ना कुठल्या पार्टमध्ये जातेच. ते लवकर नाही काढले तर पार्ट खराब होण्याची शक्यता असते.

wash-car

> पावसाळ्यात गाडीचे पार्ट खराब होऊ नयेत म्हणून त्यावर डिझेल आणि इंजिन ऑईल एकत्र करुन गाडीच्या खालच्या बाजूला इंजिनच्या जवळ लीफ स्प्रिंगवर लावावे. यामुळे गाडीला गंज फकडत नाही. पण हे मिश्रण डिस्क ब्रेक, कॅलिपर्स, व्हील ड्रम आणि रबर पार्टला लावू नये.

> पावसाळ्यात घराबाहेर किंवा कार्यालया बाहेर पडण्याआधी गाडीचे टेललाईट आणि हेडलाईट तपासावेत. पावसाळ्यात पाणी आत गेल्याने बऱ्यावेळा गाडीचे लाईट बंद पडतात. यामुळे गाडी सुरू करण्याआधीच ही काळजी घ्यावीoiling-car

> गाडीला चांगल्या प्रतीचे टायर्स लावावेत जेणेकरुन ते पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावरुन घसरणार नाहीत. गाडीचे वायपर ब्लेड आणि वॉश पाईप सिस्टम तपासून घ्यावी. गरज पडल्यास ती बदलून टाकावी.

> वायपर ब्लेड खराब असल्यास त्वरीत बदलावे. वायपर ब्लेड खराब असेल तर चालकाला काचेतून समोर बघण्यास त्रास होतो. तसेच गाडीच्या पुढच्या आरशावरही ओरखडे पडू शकतात.

stafeny

> संकट सांगून येत नाहीत. यामुळे स्टेफनी डिक्कीत न ठेवता पुढच्या सीटच्या खाली ठेवावी. कारण पावसाळ्यात पाण्यामुळे बऱ्याचवेळा गाडीचा मागचा व पुढचा दरवाजा लॉक होण्याची शक्यता असते. यामुळे प्रतिकूल परिस्थितीत तुम्हांला गाडीबाहेर पडणे कठिण होऊ शकते. पण खिडक्यांच्या तुलनेत गाडीच्या समोरच्या भागातील काच सहज फुटू शकते. यामुळे संकंटकाळात स्टेफनीच्या मदतीने तुम्ही समोरची काच फोडून सहज बाहेर येऊ शकता.