करीयर-मातीतले हात

सामना ऑनलाईन, मुंबई

बागकाम… हे निसर्गात रमायला लावणारे… मातीशी जवळीक साधणारे एक आनंददायी करियर आहे. बागकामातून आपल्या आवडीची फळे, फुले, भाजीपाला यांची रोपे लावण्याची, जगवण्याची, वाढवण्याची आणि निगा राखण्याची पद्धत आहे. बागकाम हे मोठमोठय़ा उद्योगधंदे, घराचे अंगण, परसात, गच्ची, उपलब्ध जागेत असे वेगवेगळ्या स्तरांवर केले जाते. याविषयी अधिक अभ्यास करून, माहिती मिळवून रोजगाराची संधीही मिळवता येऊ शकते.

कोर्सेस

  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  • कृषी संशोधन केंद्र, पालघर
  • मुंबई विद्यापीठ, कलिना
  • निसर्ग नर्सरी, १०३, ५, नानावटी शाळेच्याबाजूला,मुंबई ५६
  • ग्रीन क्रिएशन्स, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पूर्व)

पात्रता

  • घराच्या अंगणात, गच्चीत, खिडक्यांमध्ये फळ, फूल, भाज्या यांची रोपे लावल्यास त्यांची निगा राखण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी.
  • बागेची निर्मिती, जोपासना, रोपटी लावण्याची पद्धत, त्यांची नियमित देखभाल करणे, छाटणी करणे, किडींवर नजर ठेवणे, रोपटय़ांना आकार देणे यासाठी प्रशिक्षण
  • आणि आवश्यक कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे.