‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक

सामना ऑनलाईन, टोकियो

जपानमधील कार कंपनी निसान मोटर्सचे संचालक कार्लोस घोस (64) यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक उत्पन्न लपवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जपानमधील आर्थिक कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

निसान कंपनीनेही कार्लोस यांच्यावरील आरोप खरे असल्याचे सांगितले आहे. कार्लोस यांनी कंपनीच्या पैशांचा वापर वैयक्तिक वापरासाठी केल्याचे उघड झाले आहे. कार्लोस यांच्यासह निसान कंपनीचे अध्यक्ष ग्रेग कैली हेदेखील चौकशीच्या फेऱ्यात असून लवकरच त्यांचीही हकालपट्टी होणार आहे.

कार्लोस फ्रान्समधील ऑटो कंपनी रिनॉल्टचेही चेअरमन आहेत. डबघाईला आलेल्या निसान कंपनीला वाचविण्याचे काम कार्लोस यांनी केले होते. 1999 मध्ये त्यांनी रिनॉल्ट आणि निसानची भागीदारीही झाली होती. त्यानंतर 2001 मध्ये कार्लोस निसानचे सीईओ बनले.