प्रेक्षकांसाठी कार्निव्हल सिनेमाच्या नव्या योजना

सामना ऑनलाईन । मुंबई

कार्निव्हल सिनेमा या मल्टीप्लेक्सची शृंखला असलेल्या थिएटर्सने प्रेक्षकांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. क्वीन्स वेन्सडेज, फॉरएवर यंग थर्सडेज, संडे फंडे आणि हाफ तिकीट या योजना आहेत. क्वीन्स वेन्सडेजमुळे महिलांसाठी सवलती देण्यात येतील. फॉरएवर यंग थर्सडे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. संडे फंडे म्हणजे लहानग्यांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वांचेच मनोरंजन.

बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबरला हाफ तिकीट या योजनेत ९ आणि त्याहून कमी वयोगटांतील मुलांसाठी तिकिटांमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे, अशी माहिती कार्निव्हल सिनेमाजचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दिना मुखर्जी यांनी दिली.