बाळासाहेब नाहटा यांच्यासह लोणी सेवा संस्थेच्या तत्कलीन संचालकावर गुन्हा दाखल

1

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

लोणी वि.का .सेवा संस्थेच्या तत्कालीन 13 संचालकासह सचिव यांनी संगनमताने 7/2/2015 ते 26/9/2018 या काळात मृत सभासदाच्या विमा रकमेत अपहार केल्याचा आरोप आहे. यात संस्था रोज किर्द ,व्हाऊचर आणि मृताची पत्नी यांनी दिलेले प्रतीज्ञापत्र यात विसंगती आढळली. संचालक मंडळ व सचिव यांनी खोटी व्हाऊचर तयार केली. बोगस नोंदी केल्या. खोटे आभिलेख तयार केले व मृत सभासदाचा विमा रक्कमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व या संस्थेचे संचालक प्रवीणकुमार नाहटा यांच्यासह लालासाहेब काकडे ,सुभाष कोळपे,विठ्ठलराव खेडकर,मोहन काकडे,राजाभाऊ काकडे, बाबासाहेब कुदांडे, संभाजीराव काकडे ,रुपाली काकडे ,संतोष काकडे ,भगवान धाकड ,यांच्यासह सचिव बबन भागवत ,श्रीपती साळवे अशा सर्वांवर श्रीगोंदा पोलिसांनी तपासी अधिकारी चाबूकस्वार यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा आधिनियम 1967 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.