रोखीची चणचण फेब्रुवारी पर्यंत जाणवणार

11
संग्रहीत फोटो


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३७ दिवस उलटले तरी नोटाहाल संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अद्यापही एटीएम आणि बँकांसमोर लांबलचक रांगा लागत आहेत. ‌रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील प्रिंटिंग प्रेसची नोटा छापण्याची क्षमता तसेच नोटा वितरित करण्याची क्षमता पाहता पुरेसे नवीन चलन बाजारात येण्यास फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, रद्द केलेल्या ८५ टक्के चलनातील ७५ टक्के चलन व्यवहारात परत येण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या ‘इकोरॅप’ या अहवालानुसार सरकारी टांकसाळींची वेगाने छपाई सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ५० टक्के तर, जानेवारी अखेरपर्यंत ७५ टक्के चलन व्यवहारात येईल. फेब्रुवारी २०१७पर्यंत अंदाजे ७८ ते ८८ टक्के चलन उपलब्ध होईल. नव्याने बाजारात येणारे चलन कमी चलनी मूल्याच्या नोटांमध्ये असेल,असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत देशातील नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या