वादळात हरवलेली मनीमाऊ १४ वर्षानंतर घरी परतली

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

२००४ साली वादळात हरवलेली प्रिय मांजर जिवंत सापडल्याने अमेरिकेतील फ्लोरिडात राहणाऱ्या पेरी मार्टीनच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. १४ वर्षापूर्वी वादळात हरवलेली मांजर जिवंत नसावी असं पेरी समजत होता. मात्र तिला आपल्यासमोर जिवंत बघून पेरीचा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. पेरीला त्याच प्रिय मांजर जिवंत असल्याची माहिती ‘ह्यूमन सोसायटी ऑफ द ट्रेज़र कोस्ट’ने फोनवर दिली होती.

पेरीने २००२ साली एक मांजर दत्तक घेतले होते. त्या मांजरावर त्याचा खूप जीव होता. मांजरानेही त्याला लळा लावला होता. तो जिथे जायचा तिथे त्या मांजराला सोबत नेत असे. त्याचदरम्यान २००४ साली आलेल्या चक्रीवादळाने
अमेरिकेतील अनेक गाव उद्वस्त केली. यात अमेरिकेचे खूप नुकसान झाले. यात पेरीची मांजरही हरवली. वादळ शमल्यावर पेरीने मांजराला खूप शोधलं पण ती सापडली नाही.यामुळे वादळात ते मेलं असाव अस पेरीला वाटलं. पण तरीही त्याने ‘ह्यूमन सोसायटी ऑफ द ट्रेज़र कोस्ट’कडे मांजर हरवल्याची तक्रार नोंदवली. बघता -बघता या घटनेला १४ वर्ष उलटली. पण काही दिवसांपूर्वी ‘ह्यूमन सोसायटी ऑफ द ट्रेज़र कोस्टकडून पेरीला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने पेरीला त्याच हरवलेलं मांजर सापडल्याचे सांगितले. सुरुवातीला कोणीतरी आपली थट्टा करत असेल असे पेरीला वाटले. पण ज्यावेळी त्याने आपल्या डोळ्याने मांजराला बघितले. तेव्हा त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.पण तिच्या गळ्यावर लागलेली मायक्रो चिप बघितल्यावर ती माझीच मांजर असल्याचा विश्वास वाटल्याचा पेरीने सांगितल आहे.

‘ह्यूमन सोसायटी ऑफ द ट्रेज़र कोस्ट’ ने फेसबुक ही माहिती पोस्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मोकाट मांजर आमच्या आवारात फिरत होतं. यामुळे अधिकाऱ्यांनी तिला पकडलं असता तिच्या गळ्यावर एक मायक्रोचिप बसवण्यात आल्याचं व त्यावर तिच्या मालकाची माहिती असल्याचं आम्ही बघितलं. त्यात दिलेल्या फोनवर कॉल केला असता ती पेरी मार्टीनचीच मांजर अ्सल्याचं स्पष्ट झाल असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ही मांजर आता माझ्यासारखीच म्हातारी झाली आहे, अशी मिश्किल भावना पेरीने व्यक्त केली आहे.