आजचे भविष्य

मेष

मेष राशीने आज आधी विचार मग कृती या म्हणीप्रमाणे वागलेले बरे. घाईत कुठलाही निर्णय न घेणे योग्य. आपल्या स्पष्टवक्तेपणावर लगाम घालावा. रस्ता जपून ओलांडावा.

वृषभ

नवीन वाहन ,घर घेण्याची योजना आखाल. अपत्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. मित्रांबरोबर लांबच्या प्रवासाचा बेत आखाल.

मिथुन

आर्थिक चणचण जाणवेल. खर्चावर लगाम घालणे आवश्यक. वायफळ चर्चा टाळलेली बरी. महत्वाची कागदपत्रे वाचूनच सही करा.

कर्क

अपेक्षित फोन येतील. रेंगाळलेली कामे हळूहळू सुरु होतील. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. वाद विवादाला सामोरे जावे लागेल.

सिंह

अभ्यासात,कामात लक्ष लागणार नाही. सुटीचा बेत आखाल.जुन्या आठवणी ताज्या होतील.आवडत्या व्यक्तीबरोबर लॉंग ड्राईव्हला जाल.

कन्या

आनंदाची बातमी कळेल, ऑफिस व घरात शुल्लक कारणावरुन चिडचिड होईल, अध्यात्मात मन रमेल.

तुळ

थोरामोठ्यांचा सहवास लाभेल. अचानक लाभ होईल. घरातल्या ज्येष्ठांच्या प्रकृतिची काळजी घ्या.

धनु

अंथरुण पाहून पसरावे लागतील. प्रलोभनांना फसू नका. जुन्या आठवणी त्रास देतील. चटपटीत खाण्याची इच्छा होईल.

वृश्चिक

वाहन जपून चालवा,जवळच्या व्यक्तींशी वाद होतील,बोलण्यात मृदूपणा असला की अनेक प्रश्नांचा गुंता आपोआप सुटत जातो. जिभेवर ताबा ठेवा.

मकर

जवळच्या व्यक्तीचा ओरडा खावा लागेल. समजुतीने प्रश्न सोडवाल. हातातून दानधर्म होईल. एकांतात वेळ घालवण्याची इच्छा होईल.

संपादकीय

लाइफस्टाईल

मनोरंजन