सदाफुली

सदाफुली… घरोघरी अंगणात आढळणारे हे फूल बाराही महिने फुललेलेच असते… साधारण दिसणारे सदाफुलीचे झाड काही वेळा काढून टाकले जाते… सदाफुलीची पांढरी, गुलाबी, जांभळी नाजूक फुले सुंदर दिसतात… सौंदर्याबरोबरच यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत.

मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, ऑनिमिया, सर्दी अशा आजारांवर सदाफुलीचे फक्त एक फूल गुणकारी आहे. सदाफुली वात आणि पित्ताचे शमन करते, मेंदूला शांती देते, मधुमेह नियंत्रित करते. तित्यातील भारनाशक गुणधर्मामुळे लठ्ठपणाही दूर करते. यासाठी सदाफुलीची ३ पांढरी फुले रोज चावून चावून ८-१० दिवस खावीत. पुन्हा ८-१० दिवसांनी हा प्रयोग करून पहावा. सदाफुलीच्या मुळाच्या सालीत फेलोनिक राड, एक उडनशील तेल, दोन अल्कोहोल, दोन ग्यालकोसाइड, टॅनिन, करोटिनाइड, स्टिरॉल व उससोलीक ऑसिड असते. सदाफुलीच्या पाना-फुलांचा-मुळांचा उपयोग अनिद्रा आणि मानसिक उद्रेक दूरकरून शांती प्रदान करण्यासाठी केला जातो. विंचू आदि विषारी प्राणी किंवा किडे चावले असता सदाफुलीच्या सालीचा लेप लावल्यास किंवा पानांचा रस चोळल्यास फायदा होतो. रक्तातील साखर कमी करण्यासाठी एका कपात तीन ताजी फुले घेऊन त्यात अर्धा कप गरम पाणी टाकावं. पाच-सहा निनिटांनी फुले काढून टाकावीत. हे पाणी रोज सकाळी अनशापोटी ८-१० दिवस घेऊन पाहा.

पानांचा उपयोग
सदाफुलीच्या पानांपासून अल्कलाईड काढतात. सदाफुलीच्या मुळापासून मिळणाऱ्या अजमॅलसीन सर्पेटाइन या अल्कलाईडचा कर्करोग प्रतिबंध तयार करण्यात येणाऱ्या औषधात वापर करतात. व्हीनक्रिस्टीन सल्फेट हे औषध रक्ताच्या कर्करोगावर वापरतात. तसेच लुरोसिडीन, लुरोसोबिन, रोविडीन ही अल्कलाईड्स कर्करोग प्रतिबंधक म्हणून ओळखली जातात. पानांचा उपयोग मधुमेह बरा करण्यासाठीही होतो.